Case Study

रस्त्यावरील बाल शोध मोहीम

रस्त्यावरील बाल शोध मोहीम   केस स्टडी

दिनांक :-  22 जून 2023

वार:- गुरुवार

ठिकाण :- तहसिल कार्यालय चिखली

जिल्हा :- बुलडाणा

            अस्मिता संस्था महिलांचे व बालकांचे आरोग्य सदृढ राहावे , बालविवाह आणि बालमजुरी थांबवावी यासाठी प्रयत्नशील आहे . यासाठी रस्त्यावरील बालकांची शोध मोहीम या सारखे उपक्रम बऱ्याच वर्षापासून विविध गावागावंमध्ये राबविणे सुरू आहे. बालपण देग देवा , असे आपण नेहमी म्हणतो . कारण बालपणीचा काळ खुपचं सुंदर आणि सुखाचा असतो. ना कशाची तमा ना कशाची चिंता, मात्र हा सुखाचा काळ लभान देखील नशिबात असावं लागत आज सिग्नल जवळ काहीना काही वस्तू विकणारी , हॉटेल मध्ये कप बशा विसळणारी अनेक मुलं अवती भोवती दिसतात, त्यानं कसलं आल बालपण . घरामधे अठरविश्व दारिद्य्र , शिक्षणाचा आभाव, कौटुंबिक समस्या यामुळे अनेक बालकांना लहान पणापासून बैलासारखे कामाला जुंपल जात. खेळण्या बागडण्याच्या वयात काम करावे लागते.

           अस्मिता संस्था , महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण पुणे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी कक्ष बुलडाणा, महिला व बाल विकास यांच्याकडून रस्त्यावरील बालकांची शोध मोहीम कार्यक्रम राबविण्यात आला.चिखली शहरात खामगाव चौफूली, शासकीय रुग्णालय परिसरात, बस स्थानक, DP रोड यासारखे हॉट स्पॉट ओळखून त्याची नोंद करून घेण्यात आली. हॉट स्पॉट वर जाण्यासाठी टीम निवडण्यात आल्या. हॉट स्पॉट वर जाऊन टीम ने रस्त्यावरील बालकांचा व बालमजुरांचा शोध घेण्यास सुरुवात केली .  शोधा मोहीम कार्यक्रमाला उपस्थित मनोज डांगे CWC अध्यक्ष, ॲड. वावगे मॅडम , पालकर मॅडम CWC सदस्य, दिवेश मराठे DCPU, दीपक सावळे प्रोटेक्शन ऑफिसर चिखली,  child line buldana 1098 , तहसीलदार, नायब तहसीलदार चिखली , पोलीस अधिकारी चिखली, अंगणवाडी सेविका , मदतनीस , सुपरवयझर चिखली , प्रज्ञा झिने अस्मिता संस्था, DCPU युनिट ऑफिसर उपस्थित होते .

रस्त्यावरील बालकांचा शोध घेत असताना रस्त्यावर भिक मागणारे 17 बालक आणि 4 बालमजूर सापडले . त्यांना CWC समोर हजर करण्यात आले . त्या बालकांसोबत चर्चा केल्यानंतर असे कळले की त्यांच्या कड आधार कार्ड पण नाहीत.  त्यांनतर CWC, तहसीलदार अस्मिता संस्था यांच्या मदतीने त्यांना आधार कार्ड काढून देण्यात आले. तसेच त्या मुलांना अंगणवाडीमध्ये प्रवेश करून देण्यात आला . त्यांच्या कुटुंबाला मोफत राशन देण्याची सोय करण्यात आली .मोहिमेमध्ये सापडलेल्या 4 बालमजूरांना आणि त्यांच्या पालकांना समुपदेशन करून त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली . बालकामगारांना समुपदेशन करतांना असे आढळून आले की वडील नसल्याने घराला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते मूल काम करतात . काहींचे वडील दारू पितात . शिक्षणाचा खर्च आणि घरची जबाबदारी या कारणाने ही मुलं मजुरी करतात.  त्यांच्या शिक्षणाला लागणारे साहित्य , पुस्तके देण्यासाठी अस्मिता संस्था कार्य करत आहे.

        ज्या वयामध्ये मुलांच्या हातात पुस्तके असायला हवी त्या वयामध्ये त्यांना मजुरी करावी लागते ही परिस्थिती बदलण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे . ती 17 भीक मागणारी मुले आज अंगणवाडी मध्ये जात आहे .  त्या 4 बालमजूरांना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळत आहे .

 

प्रज्ञा किशोर झीने

(समुपदेशक अस्मिता संस्था )